विवाह ही मानवी जीवनातील अत्यंत महत्वाची घटना आहे.आपले जीवन सुख,शांती,समाधानाने बहरुन जावे की दु:ख,कलह,क्लेशाने होरपळून निघावे हे सर्वस्वी या एका घटनेवर अवलंबून असते. म्हणूनच जीवनविद्या तत्वज्ञान या विषयाबाबत असे मार्गदर्शन करते की विवाहाचा निर्णय घेताना उपवर आणि उपवधूंनी अत्यंत सावधपणे शहाणपणाचा वापर करुन योग्य निर्णय घ्यावा.जोडीदार निवडताना त्याच्या शिक्षण,स्वभाव आणि आवडी-निवडी यांवर विशेष भर द्यावा.कारण वधुवरांच्या आवडी-निवडी जुळल्या तर असे विवाह ९९% यशस्वी होतात.
जीवनविद्या मिशन या सामाजिक संस्थेच्या समाजउपयोगी कार्यात तरुणवर्गाचा मोठ्या प्रमाणावर व उस्फुर्त सहभाग असतो.आता तर जीवनविद्या मिशन परिवाराची पाळेमुळे जगभर विस्तृत होत आहेत. या महान कार्यात सहकार्य करणा-या तरुण-तरुणींना आयुष्यभर त्यांच्यासारखीच या कार्याची गोडी असणारा जोडीदार मिळावा अशी अपेक्षा असते.त्यांच्या कुटूंबियांनाही जीवनविद्येचे संस्कार असणारे सुन-जावई हवे असतात.आजच्या तरुण-तरुणींची नाळ ही आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडलेली असल्याने या ऋणानुबंधाची योग्य दखल घेण्यासाठी जीवनविद्या मिशन एक स्तुत्य उपक्रम सुरु करीत आहे.